'लोकविहार'मध्ये विजेता संघाचा खेळाडू स्वरीत भोयर चे जंगी स्वागत

 Kknews 24 network 



कामठी: छत्तीसगडमधील रायपूर येथे १ ते ३ मे दरम्यान आयोजित ११ व्या 'नॅशनल नाईन-ए-साईड फुटबॉल चॅम्पियनशिप' मध्ये विदर्भच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. १२ वर्षांखालील गटात खेळताना विदर्भ टीमने अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावून चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले.

​विजेते खेळाडू:

या विजयी संघात कामठी येथील 'एडिफाय स्कूल' (Edify School) च्या प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये स्वरित सुरेश भोयर, ओजस काशिनाथ प्रधान, नमन दिपाणी आणि परम जांभुळकर यांनी आपल्या अष्टपैलू खेळीने विदर्भाला विजय मिळवून दिला.

​लोकविहारमध्ये उत्साहाचे वातावरण:

विजेता खेळाडू स्वरित भोयर याचे 'लोकविहार ऑरेंज सिटी पार्क' येथे आगमन होताच सायंकाळी वाजता भव्य रॅली काढून स्वागत करण्यात आले. 


​हे तर केवळ पहिले पाऊल; स्वप्न आहे भारतासाठी खेळण्याचे -- स्वरित भोयर


राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावल्यानंतर  स्वरित सुरेश भोयर "लोकमत" शी संवाद साधताना तो म्हणाला की, "हा विजय केवळ माझा नसून माझ्या  शाळेचा आणि माझ्या पालकांचा आहे, ज्यांनी माझ्या खेळावर विश्वास ठेवला. मैदानात उतरल्यावर डोळ्यासमोर फक्त आपल्या टीमला विजय मिळवून देण्याचे लक्ष्य होते. मात्र, माझे खरे स्वप्न इथून सुरू होते. मला भविष्यात भारतीय फुटबॉल संघाच्या जर्सीमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे आणि जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा उंच फडकवायचा आहे.


​स्वरितने पुढे असेही सांगितले की, त्याला फुटबॉलमधील जागतिक दिग्गज खेळाडूंप्रमाणे कौशल्य आत्मसात करायचे असून, अभ्यासाची सांगड घालत तो दररोज कठोर सराव करणार आहे.


स्वरितचे वडील  सुरेश भोयर आणि आई सुषमा भोयर यांनीही आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, स्वरितची ही जिद्द आणि आवड पूर्ण करण्यासाठी ते त्याला शक्य ते सर्व सहकार्य करतील.


यावेळी प्रा. विशाल बोरकर यांनी संचालन केले तर सचिन चिमूरकर यांनी आभार मानले.


मुलांनी अभ्यासासोबतच खेळातही प्रावीण्य मिळवावे, या उद्देशाने कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक  प्रभाकर प्रभुदेसाई, प्रभाकर सिरसाट, मोहन डोंगरे, आसाराम टांडेकर, रघुनाथ उके, श्रीराम प्रसाद आणि शिव सिंग यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...